मुंबईचं पोट भरणाऱ्या हातांचा म्हणजेच डबेवाल्यांचा आश्रयदाता "देवाभाऊ"
- Aneeshaa Chavan
- Sep 26, 2024
- 3 min read

Devendra Fadnavis - X (Formerly known as Twitter)
मुंबईतील डब्बेवाल्यांचा अखेर ४० वर्षांचा स्वतःच्या घरासाठीचा संघर्ष फळाला आला आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार श्रीकांत भारतीय यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार (मोची) समुदायाच्या सदस्यांसाठी १२,००० घरांकरिता सामंजस्य करार केला आहे. हा करार प्रियंका होम्स रिॲल्टीने प्रदान केलेल्या ३० एकर भूखंडावर विकसित केला जाणार आहे. यासाठी नमन बिल्डर्सकडून ना नफा-ना-तोटा तत्त्वावर म्हाडाकडून राबविला जाणार आहे.
फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे (PMAY) मुंबईतल्या डबेवाल्यांनी आणि चर्मकार समुदायाने स्वागत केले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट २५ लाख रुपयांमध्ये ५०० चौरस फुटांचे फ्लॅट्स उपलब्ध करून देणे हे आहे ज्यामुळे डबेवाल्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होईल, असे फडणवीस यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. सरकारने या असंघटीत समुदायाबद्दल विचार केल्याने संघटनेने फडणवीस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्यावरील विश्वासाची अधिक दृढ झाला आहे.
मुंबईचे डबेवाले हे धावत्या शहराचा कणा आहे. ते केवळ अन्नवाहक नसून मुंबईतील चाकरमान्यांचे पोट भरण्याचे दैवी कार्य ते करतात. १३० वर्षांपासून हे डबेवाले शहराला सेवा देत आहेत. १८९० साली त्यांच्या सेवेला सुरुवात झाल्यापासून, त्यांनी दुष्काळ, युद्ध, पावसाळा, हिंदू-मुस्लिम दंगली आणि अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. प्रिन्स चार्ल्स आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांसारख्या व्यक्तींच्या भेटी आणि स्वतःच्या लॉजिस्टिक कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या फेडरल एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांच्या भेटी यामुळे मुंबई डब्बेवाल्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. डेल्टा एअर आणि मॅरियट हॉटेल्ससारख्या कंपन्यांनीदेखील त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनेचे स्वागत केले आहे. या विकेंद्रित प्रणाली मधे कमी शिक्षित व अकुशल व्यक्तींनी एवढी मोठी प्रणाली उभी करून जगासमोर व्यवस्थापनेचे एक उदाहरण प्रस्तुत केले असल्याने जागतिक स्तरावर त्यांचे नाव झाले आहे.
Devendra Fadnavis - X (Formerly known as Twitter)
मुंबईच्या डब्बावाल्यांच्या या उल्लेखनीय यशाकडे कित्येक दशकांपासून प्रशासनाचे अनेकदा दुर्लक्ष झाले आहे. जे इतरांना अन्न वेळेवर पोहोचवण्याचे काम करतात त्यांच्याच मूलभूत गरजांकडे मागील उद्धव ठाकरे सरकार आणि महाआघाडीतील पक्षांकडून दुर्लक्ष केले गेले. कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान, निर्बंध, वाहतूक अडथळे आणि वर्क फ्रॉम होम अशा प्रणालीकडे जग वळल्यामुळे मुंबई डबेवाले आणि चर्मकार बांधवांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं होतं. यामुळे अनेक डबेवाल्यांचे अतोनात नुकसान झाले. दररोज ४० ते ४५ किलोमीटर सायकलचा प्रवास करावा लागला. ज्यामुळे शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळाले ,कोरोना विषाणूंनी काहींचा बळी घेतला तर काहींनी उत्पन्नाचे पर्यायी स्रोत शोधले. यातील ब-याच डबेवाल्यांनी आपल्या गावी स्थलांतर करणे पसंत केले. या सर्व कारणांमुळे मुंबईतील डबेवाल्यांची संख्या कमी होऊन सद्यस्थितीत ती ५००० वरून २००० आली आहे.
कोविड-१९ साथीपूर्वी, त्यांचे उत्पन्न दरमहा १५,००० ते १६,००० हजार रुपये या दरम्यान होते, परंतु सध्यस्थितीत ते ७,००० ते ८,००० रुपयांपर्यंत घसरले असल्याने अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठीच्या वाढत्या खर्चामुळे त्यांचा संघर्ष आणखी वाढला आहे. त्यांच्या सेवेची मागणीदेखील कमी झाली, जिथे दररोज २५ टिफिन पोहोचवले जायचे तिथे आज ती संख्या फक्त ४-५ डब्यांपर्यंत कमी झाली असल्याने , त्यांना स्वतःचे पोट भरणेदेखील कठीण झाले आहे .वाढत्या खर्चाची घडी बसवण्यासाठी कर्ज काढून संसाराचा गाडा चालवण्याची अनेकांची केविलवाणी धडपड सुरु आहे.
मुंबईतील डबेवाले व चर्मकार बांधवांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारकडे सातत्याने विनवणी करूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. मुंबईतील डबेवाल्यांचे प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी सांगितले की त्यांच्या मदतीसाठी केलेल्या विनंत्या नेहमी अनुत्तरीतच राहिल्या आहेत: "सरकारने मदत करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आम्हाला अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही."असे ते तत्कालीन सरकारबद्दल नेहमी सांगतात. इतर काही स्वयंसेवी संघटनांनी या डबेवाल्यांना तात्पुरती मदत देऊन दिलासा देण्याचे काम केले होते.
मुंबईचा कणा समजल्या जाणाऱ्या या डबेवाल्यांचे दुःख, त्यांची दुरावस्था आणि हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन फडणवीसांनी त्यांची निवाऱ्याची मूलभूत गरज भागवली आहे. त्यांच्या गरजांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आयुष्यभरासाठी निवाऱ्याची चिंता मिटवली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कठोर परिश्रमांना व समर्पणाला दिलेली ही पावती आहे, या बांधवांच्या मुंबईतील चाकरमान्यांच्या सेवेसाठीची जी वचनबद्धता आहे त्याची; त्यांना म्हणजेच डबेवाल्यांना स्वतःच्या मालकीची घरे देऊन देवाभाऊंनी ती आणखी दृढ केली आहे.
ज्यांच्या सेवेच्या व्यवस्थापनाला जागतिक मान्यता मिळाली आहे त्या दुर्लक्षित घटकांना, त्यांच्या निष्ठेचे कौतुक म्हणून राज्य सरकारने अल्पदरात गृहनिर्माण उपक्रम उभा करण्याचे कार्य करून त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेतली आहे. मुंबईतील डबेवाले व चर्मकार बांधवांसाठी एक आशेचा किरण देऊन देवाभाऊंनी त्यांना स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान केली आहे.
LINK FOR SPOTIFY -
LINK OF THE ARTICLE -
DOWNLOAD PDF HERE -
Good article